Uddhav Thackeray : “हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान, ते जिंकायचंच”; उद्धव ठाकरेंचा निर्धा

मुंबई - सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये जागरुक राहावे लागेल. अनेक जण मला सांगतात की, साहेब निवडणुका येऊ द्या. या सगळ्याची तयारी तुम्हाला करायची आहे. ही आपल्याला एक मोठी संधी आहे. हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान, ते जिंकायचेच आहे, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला.

मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांचा कधीही स्वातंत्र्याशी तिळमात्र संबंध नव्हता, ते आता स्वातंत्र्य मारायला निघालेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. जे मी सांगतोय ते सगळ्यांना पटायला लागले आहे. आता डोळे उघडले नाहीत, तर २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन गेले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोन येऊन गेला. सगळे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *