Uddhav Thackeray: हिंमत असेल तर निवडणुका घ्या, तयार आहोत; उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

Uddhav Thackeray News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर सिंह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उत्तर भारतीय समुदायाला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. 

उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाले, 'सब ठीक बा! ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल. मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे. सगळ्या भारतीयांना उत्तर हवं आहे. २५-३० वर्ष आम्ही युतीमध्ये राहिलो, काय मिळालं?

आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहे. आम्ही या ठिकाणी तुमची साथ मागायला आलो आहोत. यात गैर काय? असा सवाल उद्धव ठाकरे केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही घरात जाऊन भाकरी भाजतात. मी कधीच मराठी-अमराठी किंवा हिंदू मुस्लीम असा भेद केला नाही. बाळासाहेब कधीच असं म्हणाले नाहीत की हिंदू म्हणजे केवळ मराठी. बोहरा समाज देखील आमच्यासोबत आहे, असे ठाकरे म्हणाले.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *