Udayanraje Bhosale : कसं... बाबाराजे म्हणतील तसं... शड्डू ठाेकत उदयनराजेंनी झळकावला शिवेंद्रसिंहराजेंचा बॅनर,

 

Udayanraje Bhosale : सातारा लाेकसभा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांच्या पेक्षा अधिक मताधिक्य मिळविल्यानंतर खासदार उदयनराजे भाेसले यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येत गुलालाची उधळण केली. फटाके फाेडत समर्थकांनी उदयनराजेंची राजपथावर मिरवणुक काढली. त्यावेळी खासदार उदयनराजेंनी या मिरवणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे बॅनर झळकवले. त्यावर कसं बाबाराजे म्हणतील तसं असे लिहिले हाेते.

उदयनराजे भाेसले यांनी मतमाेजणीच्या अखेरच्या काही फे-यांमध्ये 10 हजार 172 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी विजयाकडे कूच केल्याची चर्चा आहे. दरम्यान उदयनराजेंच्या समर्थकांनी साता-याच्या रस्त्यावर उतरुन फटाके फाेडले. पेठा पेठांमधील युवा वर्ग राजपथावर दाखल झाले.

Sharad Pawar : 'निकालानंतर नेत्यांशी चर्चा, उद्या दिल्लीत बैठक', शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती!

एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज, आता कसं बाबाराजे बाबाराजे सांगतिल तसं अशाही घाेषणा देत कार्यकर्ते उदयनराजेंच्या विजयाच्या घाेषणा देऊ लागले. या मिरवणुकीत उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे छायाचित्र असलेले बॅनर झळविले. हळूहळू ही मिरवणुक शहरातून पुढे सरकत हाेती.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply