Udayanraje Bhosale : लाेकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भाेसले, नरेंद्र पाटील समर्थक आक्रमक; राजेंसाठी मराठा समाज उतरला रस्त्यावर

 Udayanraje Bhosale : लाेकसभा निवडणुकीची  तारीख येत्या एक दाेन दिवसांत जाहीर हाेण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप सातारा लाेकसभा मतदारसंघात  महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा  उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीतून भाजपचे  राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांना उमेदवारी द्यावी यासाठी उदयनराजे सर्मथकांसह मराठा समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दूसरीकडे नवी मुंबईत माथाडी कामगारांनी बैठक घेत भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. 

लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या  जाहीर झाल्या. यामध्ये सातारा लाेकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घाेषणा अद्याप न झाल्याने साताऱ्यातील उदयनराजे समर्थक आणि मराठा समाज आक्रमक झाल्याचे आज (शुक्रवार) पाहायला मिळाले.

Lok Sabha Election 2024 : प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकीच्या तारखेची उद्या घोषणा

साताऱ्यातील शिवतीर्थ येथे मराठा समाज व उदयनराजे समर्थकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान गुरुवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांना उदयनराजे समर्थकांनी घेराव घालत उदयनराजेंच्या उमेदवारीची घाेषणेचे काय असा सवाल केला.

भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी : माथाडी कामगार

सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपने महायुतीची उमेदवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना द्यावी अशी मागणी माथाडी कामगारांनी एपीएमसीच्या बैठकीत केली. एपीएमसी बाजारपेठेतील पाचही मार्केटचा नरेंद्र पाटील यांना पाठिंबा असून मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील यांना चांगली मते मिळाली होती. भाजप महायुतीने पाटील यांना उमेदवारी दिल्यास यंदा विजयी गुलाल उधळू असा विश्वास माथाडी कामगारांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply