tv9 Marathi Special Report | अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिथे शेवटची सभा घेतली होती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील वराळे गावात ही सभा झाली होती. ही अजित पवारांची शेवटची सार्वजनिक सभा ठरली. या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ‘राजकारण लई वंगाळ झालंय, त्यात आता रस राहिला नाही’ असे वक्तव्य केले होते. जे त्यांच्या राजकीय प्रवासातील स्मरणीय विधान ठरले. या सभेनंतर केवळ आठ दिवसांतच अजित पवारांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात शोक आणि हळहळ पसरली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार सुनीता बुट्टे पाटील यांचा विजय झाला. सुनीता बुट्टे पाटील ह्या शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी खेडमधील ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळेंच्या सख्या बहिणीला पराभूत केले. अजित पवारांनी शेवटच्या सभेत उपस्थित राहून उमेदवारांना प्रोत्साहित केलेले ते क्षण आणि त्यांचे योगदान आता कार्यकर्त्यांच्या आठवणीत कायम राहणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *