Turkey Earthquake Update : तुर्कस्तान भूकंपाच्या 7.8 रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरला, 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

Earthquake in Turkey : तुर्कस्तान आज भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला आहे. नूर्दगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली.

मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने  भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी ठेवली आहे. भूकंपानंतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि लोक बचावासाठी रस्त्यांवर आले होते.

तुर्कस्तानातील भूकंपाचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. तुर्कीमध्ये आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सीरियात जीव गमावलेल्यांचा आकडा 90 वर पोहोचल्याची माहिती आहे. 500 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.भूकंपाचे धक्के सीरियापर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपामुळे अनेक जीवितहानी होण्याची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *