Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची सेटवरच आत्महत्या

Tunisha Sharma: 'अलीबाबा दास्तान-ए-काबुल' फेम अभिनेत्री टुनिषा शर्माने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने आत्महत्येचा प्रयत्न करताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचे निधन झाले आहे. टुनिषाने वयाच्या 20 व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलण्या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. ती अनेक मालिकांमध्येही भूमिकेत होती.

वीरपुत्र– महाराणा प्रताप नंतर, तिने चक्रवर्ती अशोक सम्राट सोबत इंटरनेट वाला लव या ही मालिकेत दिसली होती. सध्या ती अलीबाबा या शोमध्ये प्रमुख भूमिकेत होती. या कार्यक्रमामध्ये तिने राजकुमारी मरियमची भूमिका साकारली होती. टुनिषा शर्माने टीव्ही शोसह अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने दबंग 3, कहानी 2 सारख्या चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका केली आहे.

टुनिषा शर्माने आत्महत्या करण्याआधी काही तास एक फोटो पोस्ट करत शेअर केला आहे. तुनिषाने फोटो पोस्ट करत लिहिले की, 'ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे त्या गोष्टीत आपण कधीच थांबयचं नाही.'

या फोटोमध्ये टुनिषा तिच्या शोच्या सेटवर दिसत असून स्क्रिप्ट वाचत असल्याचे दिसत आहे. 4 दिवसांपूर्वीही टुनिषाने तिचे काही फोटो पोस्ट केले होते आणि लिहिलं होतं की, 'या क्षणी आनंदी राहा, हे महत्वाचं आहे.' ती सोशल मीडियावर फारच सक्रिय राहायची. ती इन्स्टाग्रामवर तिच्या सेटवरून अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची.

मुख्य म्हणजे कतरिना कैफच्या 'फितूर' या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने फिरदौसची भूमिका साकारली होती. 'बार बार देखो' या चित्रपटातही तिने दियाची भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने कतरिना कैफच्या बालपणीची भूमिका साकारली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply