Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबाबतचा निर्णय काही तासांत मागे, तहसीलदारांकडून जाहीर प्रगटण

Tuljapur : तुळजाभवानी मंदिरामध्ये विशिष्ट प्रकारचे कपडे घालून येणाऱ्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. मात्र अल्पवधीतच मंदिर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.

मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे (Western Cloths) घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला होता. मंदिर परिसरामध्ये याबातचे फलक देखील लावण्यात आले होते.

मात्र आता तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे. 

तुळजाभवानी मंदिर परिसरात 'अंग प्रदर्शन, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले होते. या फलकावर 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भाव ठेवा, अशा प्रकारची विनंतीही करण्यात आली होती. 

मात्र अवघ्या काही तासात हा निर्णय बदलण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला होता. या निर्णयावर पुजारी व भाविकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. तर तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे मंदिर प्रशासनाने सावध भूमिका घेत आपला निर्णय मागे घेतला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply