Trimbakeshwar controversy : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणी आजपासून एसआयटी चौकशीला सुरुवात

Trimbakeshwar temple entry controversy : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश वाद प्रकरणात एसआयटी चौकशीला आजपासून होणार सुरुवात होणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरमधून समोर आलेल्या वादानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज एसआयटी पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहे. एसआयटी पथकात वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

राजकारण करू नका, गावकऱ्यांचं आवाहन

जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केलाची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमधील गावकऱ्यांनी असा कोणाताही प्रकार येथे घडला नसल्याचे म्हटले आहे.

तसेच मंदिरात धूप दाखवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरु असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. सर्व गावकरी येथे एकोप्याने राहतात. आम्हाला गावात शांतता हवी आहे. त्यामुळे राजकारण करून नका असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.

त्र्यंबकेश्वरमधील मस्जिद ही नाथ संप्रदायातील मंदिर असल्याचा दावा

दरम्यान त्र्यंबकेश्वरमधील हजरत सय्यद गुलाब शाहावली मस्जिद ही नाथ संप्रदायातील मंदिर असल्याचा खळबळजनक दावा महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील मशीद ही नाथ संप्रदायातील मंदिर असून तिथं 3 भुयार आहेत. त्या भुयारांमध्ये गणपती आणि देवता आहेत.

तसेच तेथील मजारीवर नाथ संप्रदायातील चिन्हे अंकीत आहेत असा दावा महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार, इतिहास तज्ञ आणि पुरातत्व विभागाने मस्जिदीचा सर्वे करावा आणि नाथ संप्रदाय मंदिर आमच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आखाडा परिषदेची त्र्यंबकेश्वर प्रकरणात उडी

दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान आखाडा परिषदेनेही या वादात उडी घेतली आहे. धूप दाखवण्याच्या परंपरेमागील सत्य आता आखाडा परिषद शोधणार आहे. यासाठी आखाडा परिषदेनेही काही सादूंची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या परंपरेची चौकशी करणार आहे. परंतु या सर्व वादात त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांनी मात्र या घटनेचं राजकारण करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत गावात एकोपा कायम राखण्याची स्तुत्य भूमिका घेतली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply