Trimbakeshwar : श्रावणात त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, मंदिर समितीचा दर्शनाबाबत मोठा निर्णय

 

Nashik : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला  जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्र्यंबकेश्वरच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांना जास्त वेळ रांगेमध्ये उभे राहावे लागणार नाही. यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच त्यांना दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना त्र्यंबकेश्वरचे दर्शन वेळेत मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांच्या सोयीसाठी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना टाईम दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच दर्शन देण्याचा निर्णय मंदिर विश्वस्त समितीने घेतला आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना वेळेत आणि सुखकर दर्शन व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Gadchiroli Flood : गडचिरोलीला पावसाने झोडपले, ५ व्या दिवशी पूरस्थिती कायम; राष्ट्रीय महामार्गासह १२ प्रमुख रस्ते बंद

ऑनलाइन पाससाठी भाविकांना २०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मंदिराची रचना बघता ठराविक भाविकांना रोज ऑनलाईन पास मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मुखदर्शनाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराबाहेर आवारात त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची हुबेहूब प्रतिकृती साकारून मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आगामी श्रावण महिन्यात या सुविधा देण्याचा मंदिर समितीचा मानस आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply