Thane Water Cut : भर पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणीसंकट, 'या' भागातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी राहणार बंद

 

Thane Water Cut : आधीच पाणीकपातीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांचं आणखी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. महापालिकेने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामे हाती घेतल्याने येत्या शुक्रवारी (ता. २८) काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तब्बल २४ तासांसाठी हा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, तसेच पाणी भरून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे ठाण्यातील (Thane)काही भागात साधारण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याती माहिती ठाणे महापालिकेने मंगळवारी दिली. हा पाणीपुरवठा गुरुवार २७ जून दुपारी १२ वाजता बंद होणार असून ते २८ जूनच्या दुपारी १२ वाजेपर्यंत बंद असेल.

Pune Crime : वानवडीतील खुनाचा उलगडा; मेहुण्यानेच काढला काटा

ठाणे शहरातील काटई नाका ते शीळ टाकी या भागातील जलवाहिनीचे तातडीने दुरुस्ती आणि देखभालीचे काम ठाणे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका भागातील मुंब्रा तसेच दिवा ,माजिवडा-मानपाडा आणि वागळे या विभागातील पाणीपुरवठा ठप्प होणार आहे.

चोवीस तास असलेल्या पाणी कपातीमुळे प्रभावित असलेल्या मुख्य विभागात दिवा(Diva) आणि मुंब्रामधील (प्रभार क्रमांक २६ आणि ३१ मधील भागांचा समावेश नाही) मात्र कळवा ,रुपादेवी पाजा आणि किसान नगर क्रमांक २ तसेच कोलशेत या भागांचा समावेश आहे. पुन्हा पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर साधारण पुढील दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असून नागरिकांनी पाण्याचा काटकसीरे वापर करण्यात यावा असे ठाणे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply