
Thane : बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन महिला कार्यकर्त्यांना शिंदे-शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची पाकिटे वाटप करताना रंगेहात पकडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बदलापूर पश्चिम भागातील पनवेलकर संकुल परिसरात घडली असून, याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा कबूल आणि सुनिता चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये शिंदे-शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजपसोबत युती असून, या युतीकडून प्रभाकर पाटील निवडणूक लढवत आहेत, तर शिंदे शिवसेनेकडून तुकाराम म्हात्रे मैदानात आहेत. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, २७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शिंदे-शिवसेना कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पैशांची पाकिटे वाटत असल्याची माहिती मिळाली.
|
|
या माहितीच्या आधारे, शिंदे-शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या दोन महिलांना रंगेहात पकडले. यानंतर घटनास्थळी काही काळ शिंदे-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आणि जोरदार राडा झाला. दोन्ही उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमकही झाली, ज्यामुळे दिवसभर या प्रभागात तणावपूर्ण राजकीय वातावरण होते. प्रचाराच्या धुराळ्यात पैसे वाटपावरून झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले.
दरम्यान, राडा सुरू असतानाच शिंदे-शिवसेना कार्यकर्त्यांनी या महिलांना पकडून जाब विचारला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली. या पाकिटांमध्ये प्रत्येकी तीन-तीन हजार रुपये भरलेले होते. निवडणूक अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलांकडून काही प्रचार साहित्य आणि १ लाख ९२ हजार ५०० रुपये जप्त केले.
अजित पवार गटातील या दोन्ही महिलांवर निवडणूक विभागात कार्यरत असलेले जयवंत डोंगरे (५७) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय साहिंता कलम १७३, १४७, २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

