Thane Crime News : धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Thane Crime News : मध्य प्रदेशातील एका ३१ वर्षीय मॉडेलने मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये तिच्यावर अज्ञात व्यक्तींनी शारिरीक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. तिला अमली पदार्थ पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. कुर्ला ते कल्याण दरम्यान दरम्यान ही घटना घडली असल्याचं तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ही तरूणी मूळची ग्वाल्हेरची रहिवासी आहे. ती मुंबईत मॉडेल  म्हणून काम करते. पीडित तरूणीने रेल्वे पोलिसांना सांगितलं की, ती कुर्ला एलटीटी येथून पहाटे या ट्रेनमध्ये चढली होती. ती तुलसी एक्स्प्रेसच्या थर्ड एसी डब्यात तिच्या मूळ गावी जाण्यासाठी एकटी प्रवास करत होती. तेव्हा काही अज्ञात व्यक्तींनी तिला अमली पदार्थ पाजून धावत्या रेल्वेतच तिच्यावर बलात्कार केला.

Mumbai News : मुंबई हादरली! कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ५० वर्षीय आरोपीला अटक

संपूर्ण या घटनेचा व्हिडिओ देखील काढल्याचा आरोप या तरूणीने केला आहे. ही घटना ट्रेनमध्ये ४० मिनिटांत घडली, घडल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे. घटनेनंतर ही तरूणी झाशीत उतरली. त्यानंतर तिने घटनेच्या जवळपास ३९ दिवसांनंतर ग्वाल्हेर राज्य रेल्वे पोलिसांशी संपर्क  साधला.

ग्वाल्हेर पोलिसांनीआणखी २१ दिवसांनीमुंबईतील समकक्षांना सतर्क केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं ठाणे रेल्वे पोलिसांनी सांगितलं आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एलटीटी स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज नाही. कारण फुटेज मर्यादित दिवसांसाठी रेकॉर्ड केले जाते.

पीडित तरूणीला तिचे तिकीट किंवा कोच नंबर सांगता आलेला नाही. तिने वैद्यकीय चाचण्या करण्यास देखील नकार दिला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.ठाणे रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर आणि एसी डब्यांसह सर्व डब्यांची प्रवासी यादी स्कॅन केली आहे, परंतु कोणत्याही चार्टवर तरूणीचं नाव आढळलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply