Terror Threat Mail : NIA ला मिळाला मुंबई उडवण्याचा ई-मेल; देशभरात हाय अलर्ट जारी

Threat E-mail To NIA : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (NIA) मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.धमकीचा मेल मिळाल्यानंतर NIA ने मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. धमकीच्या या मेलनंतर मुंबईसह देशभरातील विविध शहरांना सतर्क राहाण्यास सांगण्यात आले आहे.

NIA ला पाठवण्यात आलेल्या व्यक्तीने आपण तालिबानी असल्याचे ई-मेलमध्ये म्हटले असून, तालिबानी संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार ही धमकी दिली जात असल्याचा दावा केला आहे.या ईमेलनंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सावध करण्यात आले असून, देशातील विविध शहरांना अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हा ई-मेल कुठून आला तसेच मेल पाठवणारी व्यक्ती कोण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानक यासह अनेक ठिकाणी तपासासोबत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

गेल्या महिन्यातही मिळाली होती धमकी
याआधी मागील महिन्यातही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी  बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. 1993 च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी स्फोट घडवून दहशत माजवली जाईल, अशी धमकी फोनवर देण्यात आली होती. दोन महिन्यांत हे हल्ले करू असे फोनवर सांगण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply