IND vs SL,Asia Cup 2023: टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय! प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल

IND vs SL,Asia Cup 2023 : आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेसोबत दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. नुकताच भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी विजय मिळवला आहे.

पहिल्या (१० सप्टेंबर) दिवशी पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर हा सामना राखीव दिवशी (११ सप्टेंबर) खेळवण्यात आला.

आता भारतीय संघ सलग तिसऱ्या दिवशी खेळण्यासाठी उतरणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रेयस अय्यरबाबत समोर आली मोठी अपडेट..

भारतीय मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर हा पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्यामुळे पाकिस्तानविरूद्धचा सामना खेळू शकला नव्हता.मात्र त्याच्याबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तो आता पूर्णपणे फिट आहे. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. 

भारतीय संघात मोठा बदल..

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या सामन्यासाठी शार्दुल ठाकुरला विश्रांती दिली आहे. तर त्याच्याऐवजी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply