Teacher Dress Code : शिक्षकांना ड्रेसकोड लागू होणार? शिक्षकही शाळेच्या युनिफॉर्ममध्ये?


Teacher Dress Code : एकीकडे राज्यात पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची करण्यात आल्यानं गदारोळ सुरु आहे. तर दुसरीकडे शिक्षणमंत्री दादा भुसेंनी नवीनचं टुम काढलीये.होय, शिक्षकांनाही आता शिस्त लावण्यासाठी थेट शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू कऱण्याचा निर्णय भूसेंनी घेतलाय...याबाबत भूसे काय म्हणाले पाहूया.

एकीकडे राज्यात गेल्या सरकारनं एक राज्य एक गणवेश हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा बोजवारा कसा उडाला आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी लाखो विद्यार्थी कसे गणवेशाविना राहिले हे राज्यानं पाहिलंय. त्यामुळे पुन्हा शिक्षकांसाठी गणवेशाची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित होतो. याबाबत राज्य शिक्षक परिषदेचे सरचिटणीस शिवनाथ दराडे यांनी आपली भूमिका मांडलीय.

राज्यात शासनाच्या माध्यमातून वेगेवेगळ्या योजनांच्या निधीला कात्री लावली जातेय. लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय. त्यात मंत्री दादा भुसेंनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलय.

मात्र शिक्षकांसाठी हा हिटलरी नियम कशासाठी? असा प्रश्न निर्माण झालाय.की विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी काढण्यात आलेल्या निविदांसाठी पुन्हा राज्य सरकार आणि शिक्षणमंडळ हा नवा खटाटोप करतंय का अशी शंका उपस्थित होतेय.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply