अभिमान! प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आयफोन आता भारतीय कंपनी बनवणार.. 'टाटा'चे मोठे पाऊल..

iPhone15 Launch : Apple मागच्या महिन्यात आपले नवे स्टोर मुंबई व दिल्लीमध्ये स्टार्ट केले. त्यातच एक नवीन बातमीसमोर आली आहे की, टाटा ग्रुप भारतात iPhone बनवणार आहे. सध्या भारतात अ‍ॅपलसाठी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन व विस्ट्रॉनची उत्पादने तयार केली जात आहेत.

ट्रेंडफोर्स या संस्थेच्या मतानुसार टाटा तैवानची कंपनी विस्ट्रॉनची भारतात फॅक्टरी घेतल्यानंतर अ‍ॅपलची चौथी उत्पादक कंपनी  बनणार आहे. अशातच टाटा कंपनी आता मोबाईल क्षेत्रात पदार्पण करत असल्यामुळे हा 'देसी मॉडेल' असणार आहे.

1. टाटा ग्रुप भारतात लॉन्च करणार iPhone 15 व iPhone 15 प्लस

सध्या भारतात अ‍ॅपलचे ३ पार्टनर आहेत फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर. फॉक्सकॉन हा अ‍ॅपलचा सगळ्यात जुना पार्टनरपैकी एक आहे. अशातच टाटाने कर्नाटकातील उत्पादनाची कमान आता स्वत:च्या हाती घेतल्यामुळे तैवानची कंपनी विस्ट्रॉन भारतातील त्यांचे कामकाज बंद करण्याच्या तयारीत आहे. तसेच टाटाने भारतात विस्ट्रॉनची कंपनी विकत घेतल्याची माहीती देखील समोर आली आहे. यामुळे भारतात आयफोनचा असेंबली व्यवसायात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याआधी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर सारख्या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करत आहेत. पण आता यात टाटा देखील या कंपन्यामध्ये सामील झाला आहे. तसेच यामध्ये आयफोन बनवणारी टाटा ही चौथी कंपनी असेल. ज्यामुळे iPhone 15 व iPhone 15 प्लस सीरीज एकत्र बनवली जाईल.

Phone 15 कधी लाँच होणार?

Apple द्वारे असे सांगण्यात आले आहे की, iPhone 15 यावर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. याचे कारण असे दरवर्षी आयफोन हा सप्टेंबर महिन्यात लॉन्च होतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply