Tanaji sawant : ऋषीराज न सांगता बँकॉकला का निघाला होता? तानाजी सावंतांच्या मोठ्या मुलानं सगळं सांगितलं


Tanaji sawant son : तानाजी सावंत यांचा लहान मुलगा ऋषीराज याचं अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात झळकल्या. पण त्यानंतर सत्य समोर आले होते. ऋषीराज हा मित्रांसोबत बकॉकला निघाल्याचं समोर आले होते. तानाजी सावंत यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली होती. आता तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यानं आपल्या भावाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचवेळी आमच्या घरात कोणताही वाद नसल्याचे त्यांनी सांगितलं.

गिरीराज सावंत काय म्हणाले ?

काल दुपारी ऋषीराज यांचा नंबर लागला नाही. फोन बंद असल्यामुळे आमचा गोंधळ उडाला. आम्ही तात्काळ पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी सहकार्य केलं. आमच्या घरात कुठला ही वाद नाही, असे गिरीराज सावंत म्हणाले. ऋषीराज यांनी रागारागाने घर सोडल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सावंत कुटुंबात वाद आहे का? या चर्चेनं जोर धरला होता. पण याला गिरीराज सावंत यांनी पूर्णविराम दिला आहे.

Sugar Factory : सोलापूर विभागात १६ साखर कारखाने पडले बंद; जानेवारीतच जाणवतोय उसाचा अभाव

ऋषीराज बँकॉकला का निघाला?

आमच्या घरात कसले ही वाद नव्हते आणि नाहीत. ऋषीराज दुबईवरून आला होता आणि परत व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकमध्ये जाणार होता. पण दुबई वरून आल्या आल्या मला बँकॉककडे सोडतील का? या भीतीने तो निघून गेला, असे गिरीराज सावंत म्हणाले. आमच्या कुटुंबाच्या विषयात कोणी ही राजकारण करू नये. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा झाली. पोलिसांकडून या घटनेचा पूर्ण तपास सुरू आहे, असेही गिरीराज यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply