Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षेत ४८ उमेदारांना २०० पेक्षा जास्त गुण कसे मिळाले? महसूल खात्याने दिलं स्पष्टीकरण

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधी घेण्यात आली होती. या भरतीच्या परीक्षेत ४८ उमेदवारांना २०० गुणांच्या परीक्षेत दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याची बाब समोर आली आहे. या परीक्षेचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. यावर आता महसूल खात्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेच्या निकालावरून विरोधकांनी शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा महाराष्ट्र राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Prakash Ambedkar : जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

'टीसीएसने घेतली परीक्षा'

'तलाठी भरती परीक्षा टीसीएसमार्फत घेण्यात आली होती. ही तलाठी भरती परीक्षा तब्बल ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी दिली. काठिण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे उमेदवारांचे गुण वाढले आहेत, असं स्पष्टीकरण परीक्षा समनव्यकांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

'सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, त्यावेळी आरक्षण व सारखे गुण मिळालेले अनेक उमेदवारी असतील. अशा उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत, त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होते. त्यामुळे नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडत नाही, असं परीक्षा समनव्यकांनी म्हटलं आहे.

'ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली आहे. त्यामुळे काही शिफ्टची परीक्षा सोपी आहे. तर काहींची अवघड आहे. तर काहींची कमी अधिक प्रमाणात प्रश्नांची काठिण्य पातळी बदलेली असते. त्यामुळे समानीकरण केलं जातं. ही प्रक्रिया अनेक शासकीय परीक्षांमध्ये राबवली जाते. त्यामुळे अवघड पेपर गेलेल्या उमेदवारांना न्याय मिळतो. तसेच समान गुण असलेल्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते. त्यामुळे निवड प्रक्रिया सोपी जाते, असेही त्यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply