Taj Hotel : खळबळ! मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबरप्लेटच्या २ कार; पोलीस अ‍ॅलर्ट

Taj Hotel : मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबरप्लेटची दोन वाहनं उभी असल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत मूळ वाहन चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी घटनास्थळ गाठत, दोन्ही वाहनं कुलाबा पोलीस ठाण्यात नेली असून, एफआयआर दाखल करण्यात आलाय. यामधली बनावट नंबर प्लेटची गाडी कोणती? त्याचा यामागे उद्देश काय? या सर्व प्रश्नांची शोधण्यात येत आहे. MH 01 EE 2388 हा क्रमांक दोन गाड्यांवर आढळला असून, नंबर प्लेट पिवळ्या रंगाची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास एकाच नंबर प्लेटची दोन्ही वाहनं मुंबईतील ताज हॉटेलसमोर उभी होती. त्यानंतर मुळ नंबरच्या चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची दखल घेत दोन्ही वाहने कुलाबा पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर ताज हॉटेलसमोर दुसरी गाडी नेमकी कुणाची होती याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

Nandurbar Crime : शाळा, कॉलेजपासूनच काही अंतरावर खुलेआम देहविक्री; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे या परिसरात नेहमी पोलिसांचा फौजफाटा तैनात असतो. मुंबई पोलिसांची सुरक्षा तसेच ताज हॉटेसची स्वत:ची सुरक्षा आहे. मात्र, दुपारच्या सुमारास एकाचवेळी एकाच नंबर प्लेट असलेली दोन वाहनं आल्यानं खळबळ उडाली. या दोन्ही गाड्यांवर MH 01 EE 2388 हा क्रमांक असून, दोन्ही चारचाकी गाड्यांचा रंग देखील पांढरा आहे.

चेक इनच्यावेळी दोन्ही कारचे नंबर प्लेट सारखेच असल्याचं आढळून आलं. दोघांपैकी एका कारची नंबर प्लेट खोटी असल्याचं स्पष्ट आहे. कुलाबा पोलिसांनी दोन्ही कारच्या चालकांची चौकशी सुरू केली असून, अद्याप तरी कोणताही धागादोरा सापडलेला नाही. खोटी नंबर प्लेट नेमकी का वापरली, यामागचा हेतू काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply