T20 World Cup 2026 स्पर्धेत न्यूझीलंडचा युएईवर विक्रमी विजय, एलन आणि सेफर्टचं शतक!Image Credit source: Icc X account
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड आणि युएई यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईच्या बाजूने लागला. पण सामन्यावर पकड न्यूजीलंडने मिळवली. युएईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या. तसेच विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान न्यूझीलंडने एकही गडी न गमावता पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या फिन एलेन आणि टिम सेफर्ट जोडीने युएईच्या गोलंदाजांना झोडून काढलं. पावर प्लेमध्ये या जोडीने 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दोघांनी अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही या जोडीने आक्रमक खेळी सुरूच ठेवली. या जोडीने विकेट गमावली नाही आणि विजय मिळवून दिला. टिम सेफर्टने नाबाद 89 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. तर फिन एलनने 50 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 5 षटकार मारले. न्यूझीलंडने अफगाणिस्तानंतर युएईला पराभूत केलं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडने काही विक्रमांची नोंद केली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. आतापर्यंत कोणत्याही विकेटसाठी इतकी मोठी भागीदारी झालेली नाही. फिन एलन आणि टिम सेफर्ट यांनी नाबाद 175 धावांची भागीदारी केली.
फिन एलन आणि टिम सेफर्ट या जोडीने टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध इंग्लंडच्या एलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी केलेल्या 170 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.
टी20 क्रिकेटमध्ये एकही विकेट न गमवता 150 हून अधिक धावांचा पाठलाग करणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला आहे. यात पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी असून त्यांनी इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये कराचीत 200 धावांचा पाठलाग विकेट न गमवता केला होता.
फिन एलनने नाबाद 84 आणि टिम सेफर्टने नाबाद 89 धावांची खेळी केली. पण तरीही या दोघांच्या नावावर शतक नोंदवलं गेलं आहे. टी20 क्रिकेटमध्ये या दोघांनी षटकारांचं शतक पूर्ण केलं.
न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी जोरदार फटकेबाजी करत पावरप्लेमध्ये 78 धावा केल्या. सेफर्टने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर त्याचा जोडीदार फिन एलनने 27 चेंडूत तोच टप्पा गाठला.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel