T20 World Cup 2024: अफगाणिस्तानचा PNG वर दणदणीत विजय अन् न्यूझीलंड थेट स्पर्धेतूनच बाहेर

T20 World Cup 2024 AFG vs PNG: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 29 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला (PNG) 7 विकेट्सने पराभूत केले आहे. हा अफगाणिस्तानचा सलग तिसरा विजय ठरल्याने त्यानी सी ग्रुपमधून सुपर-8 फेरीत स्थान पक्के केले आहे. त्यामुळे न्युझीलड संघाचे आव्हान अधिकृतरित्या संपले आहे.

अफगाणिस्तानने ग्रुप सी मधून सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. या ग्रुपमधून याआधीच वेस्ट इंडिजनें तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला होता.त्यामुळे प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ पुढे जाणार असल्याने आता सी ग्रुपचे समीकरण पूर्ण झाले असून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने पुढच्या फेरीत स्थान पक्के केल्याने या ग्रुपमध्ये असलेल्या युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंड या तिन्ही संघाना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
दरम्यान, त्रिनिदादला पार पडलेल्या सामन्यात पीएनजीने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 96 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने 15.1 षटकातच 3 विकेट्स गमावत पूर्ण केला.

Rohit Sharma : अमेरिकेकडून खेळणाऱ्या 'बोरीवली बॉईज'बाबत कर्णधार रोहितचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अफगाणिस्तानने 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या दोन विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण नंतर गुलबदिन नाईबने अफगाणिस्तानचा डाव सावरला.त्याने अममतुल्लाह ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांना साथीला घेत अफगाणिस्तानला सोपा विजय मिळवून दिला. नाईबने 36 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावा केल्या. तसेच ओमरझाईने 13 धावा केल्या. तसेच नबीने 16 धावांची नाबाद खेळी केली.

पीएनजीकडून अलेई नाओ, सेमो कामीया नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येती 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पीएनजी प्रथम फलंदाजीसाठी उतरले. मात्र, अफगाणिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर पीएनजीने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यातच त्यांचे ३ फलदाज धावबाद झाले. त्यामुळे पीएनजीला 19.5 षटकात सर्वबाद 95 धावा करता आल्या.

पीएनजीकडून किप्लीन डोरिगाने सर्वाधिक 27 धावा केल्या. त्याच्याशिवाय सलामीवीर टोनी उरा (11) आणि अलेई नाओ (13) यानाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

वेस्ट इंडिजकडून फझलहक फारूकीन सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच नवीन उल हकने 2 विकेट्स घेतल्या, तर नूर अहमदने 1 विकेट घेतली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply