T20 World Cup : ICC ची मोठी घोषणा! T-20 WC साठी शाहिद आफ्रिदीसह या दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी

T20 World Cup : आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदिला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या स्पर्धेचा थरार वेस्टइंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी शाहिद आफ्रिदीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यासह ख्रिस गेल, युवराद सिंग आणि उसेन बोल्ट यांचीही ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला २००७ मध्ये प्रारंभ झाला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत जेतेपदाचा मान मिळवला होता. या स्पर्धेत शाहिद आफ्रिदीची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली होती.आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनताच तो म्हणाला की, ' आयसीसी टी-२० वर्ल्डकप अशी स्पर्धा आहे, जी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. २००७ मध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावण्यापासून ते २००९ मध्ये ट्रॉफी जिंकण्यापर्यंत. माझ्या कारकिर्दीतील काही आवडते हायलाईट्स या लॅटफॉर्मवरील स्पर्धांमधून आली आहेत.”

 

शाहिद आफ्रिदीच्याकारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या स्पर्धेतील ३४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८.८२ च्या सरासरीने ५४६ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना ३९ गडी बाद केले आहेत. २००९ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या स्पर्धेतही शाहिद आफ्रिदीने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. या स्पर्धेत त्याने २ वेळेस प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आहे.

 
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिका आणि कॅनडा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. तर भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी रंगणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी रंगणार आहे.
 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply