T20 WC 2026 : कॅनडला नमवत दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेच्या इतिहासात नोंदवले इतके विक्रम

T20 WC 2026 : कॅनडला नमवत दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेच्या इतिहासात नोंदवले इतके सारे विक्रमImage Credit source: Proteas Men Twitter

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरुवात दक्षिण अफ्रिकेने विजयाने केली. कॅनडा विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. दक्षिण अफ्रिकेने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 4 गडी गमवून 213 धावा केल्या आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही कॅनडाला गाठता आलं नाही. कॅनडाचा संघ 20 षटकात 8 गमवून 156 धावांपर्यंत मजल मारू शकला. दक्षिण अफ्रिकेने हा सामना 56 धावांनी जिंकला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 2 गुणांसह नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला. दक्षिण अफ्रिकेचा नेट रनरेट +2.850 आणि न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.162 इतका आहे.  या नेट रनरेटच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. या विजयासाठी दक्षिण अफ्रिकेने या सामन्यात काही विक्रम नोंदवले. काही विक्रम मोडले, काही विक्रम रचले तर काही विक्रमांच्या जवळ पोहोचले.

दक्षिण अफ्रिकेची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 200हून अधिक धावा करण्याची ही सहावी वेळ आहे. आतापर्यंत त्यांच्या आसपास देखील कुणी नाही. भारताने तीन वेळा 200हून अधिक धावा, वेस्ट इंडिजने तीन वेळा 200हून अधिक धावा, इंग्लंडने दोन वेळा आणि श्रीलंकेने दोन वेळा 200हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली आहे.

दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली आहे. दक्षिण अफ्रिकेनने कॅनडा विरुद्ध 213 धावा केल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध 2016 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 229 धावा केल्या होत्या. 2009 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 211 आणि 2016 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 209 धावा केल्या होत्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेसाठी पाचव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी मिलर आणि स्टब्स यांच्यात झाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 75 धावांची भागीदारी केली. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेकडून क्लासेन आणि मिलरने 2024 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 79 धावांची भागीदारी केली होती.

दक्षिण अफ्रिकेने कॅनडाला पराभूत करत टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात श्रीलंकेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी20 वर्ल्डक स्पर्धेतील हा दक्षिण अफ्रिकेचा 33 वा विजय आहे. श्रीलंकेच्या नावावरही 33 विजय आहे. तर भारत या यादीत पहिल्या स्थानावर असून 36 विजय मिळवले आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दक्षिण अफ्रिकेचा हा चौथा मोठा विजय आहे. यापूर्वी स्कॉटलँडविरुद्ध 2009 मध्ये 130 धावांनी, 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 104 धावांनी, 2010 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 59 धावांनी आणि आता कॅनडाविरुद्ध 57 धावांनी विजय मि्ळवला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा आऊट होणारा विकेटकीपर बॅट्समन म्हणून क्विंटन डिकॉकने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघंही टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 32 वेळा आऊट झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान कामरान अकमल असून 30 वेळा बाद झाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *