T-20 World Cup, Super 8 : सुपर 8 चे 7 संघ ठरले! एका स्थानासाठी बांग्लादेश अन् नेदरलँडमध्ये लढत; कोणाचं पारडं जड

T-20 World Cup, Super 8 : अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. १ जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला असून साखळी फेरीतील सामने आता समाप्त होणार आहेत. तर लवकरच सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करणारे ७ संघ ठरले आहेत. तर १ स्थानासाठी २ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान कोणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेतला आहे. या २० संघांना ४ गटात विगागलं गेलं आहे. या चारही गटात प्रत्येकी ५-५ संघांचा समावेश आहे. अ गटात भारत आणि अमेरिकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर ब गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. क गटातून यजमान वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर ड गटातून दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ चं तिकीट मिळवलं आहे. तर बांग्लादेश आणि नेदरलँडपैकी एका संघाला सुपर ८ चं तिकीट मिळणार आहे.

कोणाला मिळणार सुपर ८ चं तिकीट?

क्रिकेट वर्ल्ड कप T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा संघ पोहचला सुपर 8 मध्ये, आता भारताला देणार आव्हान

बांग्लादेश आणि नेदरलँड या दोन्ही संघाचा शेवटचा सामना शिल्लक आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ३-३ सामने खेळले आहेत. ४ गुणांसह बांग्लादेशचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर नेदरलँडचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. बांग्लदेशने जर शेवटच्या सामन्यात विजय मिळवला, तर सहज सुपर ८चं तिकीट मिळेल. मात्र जर नेदरलँडला सुपर ८ फेरीत जायचं असेल, तर शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. यासह बांग्लादेशच्या पराभवासाठी प्रार्थना देखील करावी लागणार आहे. दोन्ही संघांचे गुण जर समान राहिले, तर उत्तम नेट रनरेट असलेला संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल.

या स्पर्धेत नवख्या संघांचा बोलबोला पाहायला मिळाला आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पाकिस्तानचा संघ अ गटात होता. या गटातून खेळताना पाकिस्तानला अमेरिका आणि पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply