T-20 World Cup IST Timings : टी २० वर्ल्डकप सामने बघायचेत? तर उडेल झोप! पाहा किती वाजता सुरु होतील सामन

T-20 World Cup IST Timings : आयसीसी टी -20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. वेळेत फरक असल्यामुळे ही स्पर्धा 1 तारखेला जरी सुरू होत असली तरी भारतात ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांसह एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी रंगणार आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. भारतीय संघाचे साखळी फेरीतील चारही सामने अमेरिकेत खेळले जाणार आहेत. तर साखळी फेरीतील काही सामने वेस्टइंडिजमध्ये खेळले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट फॅन्सला जर सर्व सामने पाहायचे असतील तर जागरण करावं लागू शकतं. कारण काही सामने रात्री साडेबारा तर काही सामने सकाळी पाच वाजता देखील सुरू होणार आहेत.

WI Vs AUS, Warm-Up Match : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा दणका; पूरनची 300 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

भारतीय संघाचे सामने किती वाजता सुरू होतील ?

तुम्हाला जर भारतीय संघाचे सामने पाहायचे असतील, तर जागरण करायची गरज भासणार नाही. कारण भारतीय संघाचे सुरुवातीचे तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. तर शेवटचा एक सामना फ्लोरिडामध्ये खेळला जाणार आहे. हे सामने न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतील. तर भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील. तर फ्लोरिडामध्ये होणारा सामना हा स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल तर भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल.

मात्र तुम्ही जर कट्टर क्रिकेटप्रेमी असाल आणि सर्व सामने पाहायचे असतील तर तुम्हाला सकाळी 5,सकाळी 6, रात्री 8, रात्री 9, रात्री 10:30 आणि रात्री 12:30 वाजताही सामने पाहण्यासाठी जागरण करावं लागेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply