Pune : स्वारगेट भुयारीमार्गातील दुकाने सुरु करण्याची मागणी; दुकाने बंद असल्याने वाढतोय भुयारीमार्गाचा गैरवापर

Pune : सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील मोठ्या पादचारी भुयारी मार्गाची दुरवस्था झाली होती. तसेच, तो कुलुपबंद अवस्थेत होता. सकाळने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मात्र, पालिका प्रशासनाकडून याची दखल घेत हा भुयारी मार्ग सुरु करत साफसफाई करण्यात आली. मात्र, मार्गातील दुकाने अद्यापही कुलुपबंद अवस्थेत असल्याने भुयारी मार्ग पुन्हा असामाजिक कृतींचे अड्डे बनू लागला आहे. मार्ग वापरणाऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, प्रशासनाने आता एक पाऊल पुढे टाकत ही दुकाने सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.

सर्व दुकाने बंद असल्यामुळे परिसर निर्जन भासतो. या रिकामेपणाचा गैरफायदा घेत काही मद्यपी येथे वेळ घालवत असून, उघडपणे दुर्गंधी करत असल्याने मार्गाची पुन्हा दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. पादचाऱ्यांची ये-जा वाढत असली तरी असुरक्षित वातावरणामुळे अनेकजण या मार्गाचा वापर टाळत आहेत. त्यामुळे दुकाने सुरु केल्यास मार्गाची दैनंदिन निगा राखली जाईल, गर्दी वाढेल आणि नैसर्गिकरित्या गैरप्रकारांना आळा बसेल. त्याचबरोबर, दुकानांमधून महापालिकेला उत्पन्नही सुरु होईल.

Pune : लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई; अवैध जुगार अड्ड्यावर छापा, ५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मालमत्ता विभागाकडून कारवाईची अपेक्षा

प्रकल्प विभागाने कुलुपबंद अवस्थेतेतील भुयारी मार्ग सुरु केला आहे. त्यानंतर बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून त्याची साफसफाईही करण्यात येत आहे. आता मात्र, मालमत्ता विभागाने दुकानांचे वाटप, दुरुस्ती, भाडेप्रक्रिया आणि पुनरुज्जीवन यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. भुयारी मार्ग स्वच्छ आणि वापरात ठेवण्यासाठी दुकाने सुरू करणे हा एकमेव दीर्घकालीन उपाय असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *