Swargate ST Depot Case : दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपरहण झाले होते का? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड

Swargate ST Depot Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण झाले नव्हते तर त्यांचा अपघात झाला होता अशी माहिती समोर आली आहे. वकिलाला अपहरण, मारहाणीमुळे शरीरावर जखमा नव्हत्या तर अपघातामुळे त्यांच्या शरीरावर जखमा आहेत. पुण्यातील वकील साहिल डोंगरे यांचा अपघात होऊन जखमी झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. दारू पिऊन वकील डोंगरे एका हॉटेल बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना २० ते २२ जणांनी त्यांना मारहाण करून दिवे घाटात टाकून दिल्याबाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती. याप्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे हे सागर बार येथे रात्री १० वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्केसोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.

Beed Santosh Deshmukh Case : केज की बीड? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कुठे चालणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे हे रात्री ११.३० वाजता आणि पहाटे ५ वाजता दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले. डायल १०८/११२ वर कॉल झाल्याचे आणि सासवड पोस्टे येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचे दिसून आले. पोलिसांच्या कंट्रोल रूमला एका व्यक्तीचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचाबाबत फोन आला होता.
इतकचं नाही तर डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे १०८ वर फोन करून सांगितले. त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल १०८ ॲम्ब्युलन्स आली आणि जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे साहिल डोंगरेचे कोणत्याही प्रकारे अपहरण झाले नसून त्यांचा रस्ते अपघात झाला आहे असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply