Sushma Andhare : उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारेंची प्रकृती बिघडली

Sushma Andhare :  पोलीस भरती २०२२-२३ प्रकरणी महाराष्ट्र शासन योग्य निर्णय घेत नसल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या ३६ तासापासुन उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमा अंधारे आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची तब्येत काहीशी बिघडली असून बीपी लो झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस भरतीमधील या विद्यार्थ्यांसाठी गृहविभाग का वेळ देत नाही? लाडकी बहिण योजना करतात, मग पोलीस भरतीच्या बहिणींबाबत का वेगळा न्याय? असा सवाल सुषमा अंधारे बोलताना सरकारला विचारला आहे. सुषमा अंधारे आझाद मैदानात उपोषण करत असताना त्यांची प्रकृती बिघडली आहे.

Mumbai Rain Alert : मुंबई-पुण्यासाठी पुढील 3-4 तास महत्वाचे; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

डिसेंबर २०२२ चा पोलीस भरतीचा जीआर असताना पोलीस भरती २०२४ ला सुरू केली. मुलांना वाढीव वय कारण सांगत भरतीपासून विन्मुख ठेवणे, हा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांवर अन्याय होत असल्याचं सुषमा अंधारे म्हणत आहेत. त्यामुळेच अंधारे या विरोधात आझाद मैदानावर आंदोलन करत उपोषणाला बसल्या आहेत.
 
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुषमा अंधारेंची प्रकृती बिघडल्याचं समोर  आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये, म्हणून अंधारे उपोषणाला बसल्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply