Supriya Sule : 'विधानसभेमुळे लाडकी बहिण, भाऊ सगळे आठवतील', अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला!

Supriya Sule : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. एकीकडे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सत्ताधारी सांगत असतानाच विरोधक मात्र जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्याच्या बजेटवरुन महायुतीवर निशाणा साधला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दापोडी येथे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Sambhajinagar Corporation : होर्डिंग एजन्सीकडे महापालिकेचे थकले ६ कोटी ९० लाख रुपये; आता जाहिरात लावू न देण्याचा इशारा

"राज्य सरकारतर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिले जाणार अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे. आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पडत राहणार, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच विधानसभा निवडणुका असल्याने या सरकारला लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आठवत आहेत. मात्र या योजनेत अनेक त्रुटी आहेत त्यांचा आमचा अभ्यास सुरू आहे," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply