Supriya Sule : 'तो अहवाल जाळून टाका'; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

Supriya Sule : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या अहवालाने वाद निर्माण झाला आहे. या अहवालावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, "हा अहवाल अमान्य आहे, तो जाळून टाका", अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

दीनानाथ रूग्णालयाच्या अहवालावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'हा रिपोर्ट अपूर्ण आणि दिशाभूल करणारा आहे. या रिपोर्टचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या दृष्टीने हा रिपोर्ट फाडून टाकण्यासारखा आहे. सरकारचा असा रिपोर्ट येणं हे अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही तो कदापी मान्य करणार नाही. आम्ही कोर्टात जाणार आहोत. सत्यासाठी लढा देणार आहोत, असं सुप्रिया सुळे यांनी अहवालाचा निषेध करत ठोस पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं.

जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ तारखेला दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत. तसेच रूग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीला पुन्हा लखाखी! ६ दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ, चांदीही महागली

जगताप यांचे कौतूक करताना सुळे म्हणाल्या, 'जगताप यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकार कोणाला वाचवत आहे?

दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणावर सरकारवर प्रश्न विचारत हल्लाबोल केला आहे. 'सरकारला विचारले पाहिजे, शेवटी तुम्ही कुणाला वाचवत आहात? एका निष्पाप महिलेला न्याय मिळायला हवा. पण इथे स्पष्टपणे एका डॉक्टरला वाचवण्यात येत आहे, हे दिसून येत आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जर गरज भासली, तर रस्त्यावर उतरणार

'जर गरज भासली तर, आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही अन्याय सहन करणार नाही. प्रत्येक वेळेस सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही, आम्ही आहोत, कायम आहोत आणि सत्यासाठी उभे आहोत. सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते उघड होणारच आहे. तसेच तो दिवस लवकर आणू', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply