Sunjoy Roy : कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयला हवं चाओमिन, तुरुंगातली पोळी-भाजी पाहून संताप, म्हणाला..

Sunjoy Roy : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणातला आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. संजय रॉयने ( Sunjoy Roy ) तुरुंगात मिळणाऱ्या जेवणावर संताप व्यक्त केला आहे. पोळी भाजी नाही तर चाओमिन आणि अंडी खायला हवीत असं त्याने म्हटलं आहे.

पोलिसांनी संजय रॉयबद्दल काय सांगितलं?

९ ऑगस्टला डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर ( Kolkata Rape and Murder ) संजय रॉय ( Sunjoy Roy ) त्याचा मित्र अनुपम दत्ताकडे गेला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली होती. सीबीआयच्या सूत्रांनी संजय रॉयच्या पॉलिग्राफ टेस्टबद्दल सांगितलं सांगितलं की रॉयने दावा केला की तो दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिलं. त्याने हेल्मेटने दरवाजा उघडला तेव्हा त्याने पाहिलं की ती आधीच मृत झाली होती. त्यामुळे तो घाबरून पळाला.

पॉलिग्राफ टेस्टमध्ये संजय रॉय खोटं बोलल्याची माहिती

संजय रॉयला ( Sunjoy Roy ) ८ आणि ९ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांविषयी वारंवार प्रश्न विचारण्यात आले. पण त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे खोटी आणि न पटणारी दिली आहेत, असं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं. जर तो निर्दोष असेल तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला? पोलिसांना का कळवलं नाही? बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरुद्ध इतके फॉरेन्सिक पुरावे का आहेत? असेही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

Mumbai Accident : वाऱ्याच्या वेगाने दुचाकी पळवली, नियंत्रण सुटताच तिघांनी गमावला जीव; आरे परिसरातील घटना

संजय रॉयने तुरुंगात मागितलं चाओमिन

संजय रॉयला तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. संजय रॉयने तुरुंगात मिळणारी पोळी-भाजी पाहून संताप व्यक्त केला आहे. मला अंडी आणि चाओमिन खायला द्या अशी मागणी त्याने संतापाने केली आहे. अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी त्याला हे स्पष्ट केलं आहे की तुरुंगाचे जे नियम आहेत त्यात अन्न काय द्यायचं तोही नियम आहे तुला हेच खावं लागेल. तरीही संजय रॉयने चाओमिन आणि अंडी यांची मागणी केली आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

कैद्यांना तुरुंगात दिलं जाणारं जेवण ठरलेलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात असलेल्या सगळ्या कैद्यांना पोळी-भाजी दिली जाते. मात्र संजय रॉय ( Sunjoy Roy ) या जेवणावर नाखुश आहे. त्याला अंडी आणि चाओमिनच हवं असल्याचं त्याने म्हटलं आहे. याआधी त्याला जेव्हा तुरुंगात आणण्यात आलं होतं तेव्हा मला झोप काढायची आहे असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. तो अनेकदा गोष्टी बरळत होता, नंतर मात्र त्याने असं काही केलं नाही. आता जेवणात त्याने चाओमिन आणि अंडी मागितली आहेत.

दरम्यान आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी संदीप घोष यांची चौकशी केली. सीबआयने त्यांना समन्स बजावलं होतं. मागच्या १४ दिवसांपासून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply