Sunil Tatkare : रोहित पवार भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते, सुनिल तटकरे यांचा शिर्डीत मोठा दावा

Sunil Tatkare : 'रोहित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते', असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी भाजपकडून विधानसभेचे तिकीट मागितले होते असे वक्तव्य सुनिल तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. अहमदनगर  दौऱ्यावर असलेल्या सुनिल तटकरे यांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. सुनिल तटकरे यांचा दोन दिवसांचा अहमदनगर जिल्हा दौरा आहे. सुनिल तटकरे यांच्यासोबत रुपाली चाकणकर या देखील अहमदनगर दौऱ्यावर आहेत.
 

रोहित पवार भाजपच्या वाटेवर होते -

सुनिल तटकरे यांनी सांगितले, 'इकडच्या आमदारांची नसले, पण अनेकदा त्यांचा आग्रह राहिला भाजपसोबत आपण गेले पाहिजे. त्यांनी तर २०१९ मध्ये भाजपकडे उमेदवारीच मागितली होती. कोणाला नैतिकता, कोणाला काय म्हणण्याचा अधिकार त्याठिकाणी आहे. त्याच्यानंतर सरकारमध्ये घेतलं गेलं नाही म्हणून पुन्हा एकदा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर लढवण्याबाबत मत त्यांनी काही वेळा व्यक्त केले होते' सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Khadse : विधानसभेआधी भाजपमध्ये मोठ्या हालचाली, एकनाथ खडसेंकडे लवकरच मोठी जबाबदारी

सुनिल तटकरेंचा महाविकास आघाडीला टोला -

अहमदनगर दौऱ्यादरम्यान सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'नाना पटोले 150 जागा म्हणतात. राष्ट्रवादीचे काही नेते 100 म्हणतात आणि शिवसेना 288 म्हणते. विधानसभेच्या जागा 500 च्या वर झाल्या का? हे मला माहीत नाही.', असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. तसंच, 'महायुतीत अद्याप जागा वाटपाबाबत चर्चा नाही. येत्या 15 दिवसांत जागा वाटप धोरण निश्चित होईल. आमच्या आज असलेल्या जागांचा बेस धरुनच पुढील चर्चा केली जाईल.'

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply