Sunetra Pawar: दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण…; पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

image

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.'



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *