SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

SSC-HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा १० ते १५ दिवस आधी घेतल्या जाणार आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यंदा दहावी-बारावी परीक्षांचे निकाल १५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आशालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शुक्रवारी पुण्यातील दौऱ्यावर असताना शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेतला.

राज्य मंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी महत्त्वाचे मुद्दे चर्चिले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुसे यांनी माहिती दिली की, फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. परीक्षांच्या तयारीसाठी मंडळ विशेष नियोजन करत आहे. यंदा परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तयारीसाठी जागरूक राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहेत.हे. विद्यार्थ्यांनी या बदलानुसार तयारी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेचे हॅाल तिकीट सोमवारपासून ऑनलाइन मिळणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. शाळेने हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे यासाठी कुठलेही शुल्क लागणार नाही. अशा राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत. राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे हॅाल तिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीपेक्षा १५ ते २० दिवस आधी घेतल्या जातील, असे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू होण्यापूर्वीच घोषित केले होते. त्यानुसार या परीक्षा लवकर सुरू होणार आहेत. यापूर्वी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची प्रथा सुरू झाली आहे. यंदा दोन्ही परीक्षांचे निकाल १५ मेपर्यंत जाहीर करण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply