IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का! सूर्या फिटनेस टेस्टमध्ये नापास, इतक्या सामन्यातून बाहेर

Suryakumar Yadav IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा हुकमी फलंदाज सूर्यकुमार यादव राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला, त्यामुळे आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यात तो मुकणार हे जवळपास निश्चित आहे.

आयपीएल येत्या शुक्रवारपासून सुरू होत असून सूर्यकुमारची आज तंदुरुस्त चाचणी घेण्यात आली त्यात तो अपयशी ठरला, अशी माहिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून देण्यात आली. त्याची पुढची चाचणी लवकरच होईल, त्यात पास झाला तरच तो आयपीएलमध्ये खेळू शकेल.

मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये २४ तारखेला रविवार होत आहे. या सामन्यात तरी सूर्यकुमार खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का! सूर्या फिटनेस टेस्टमध्ये नापास, इतक्या सामन्यातून बाहेर

यासोबत २७ मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, १ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आणि ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळणार का नाही हे नंतर ठरवले जाईल.

डिसेंबर २०२३ मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळताना सूर्यकुमार यादवचा गुडघा दुखावला होता, त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. जानेवारी महिन्यात म्युनिक  जाऊन त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती; परंतु अजूनही तो तंदुरुस्त झालेला नाही.

सूर्यकुमारच्या तंदुरुस्तीच्या अपडेटची आम्हीही प्रतीक्षा करत आहोत, असे मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. गतवर्षीच्या आयपीएलमध्येही तो सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळू शकला नव्हता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply