Navjot Singh Sidhu : ठोको ताली! लोकसभा नाही तर IPL च्या मैदानात नवज्योत सिंग सिद्धूची एन्ट्री... बदलली भूमिका

IPL 2024 Navjot Singh Sidhu : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी फक्त तीन दिवस बाकी आहे. 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल 2024 ची सुरुवात होणार आहे.

यादरम्यान पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अशा स्थितीत पंजाबमधील लोकसभा निवडणुकीत सिद्धू क्वचितच दिसणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 22 मार्चपासून सुरू होत आहे. स्टार स्पोर्ट्सनेही यासंदर्भात माहिती दिली आहे. 22 मार्चपासून सिद्धूचे वन लाइनर्स ऐकू येतील, असे सोशल मीडियावर लिहिले होते.

Pune Crime News : मैत्रिणीसाठी ९वीच्या मुलांमध्ये वाद; गैरसमजातून मित्राची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या

स्टार स्पोर्ट्सने टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धूला आयपीएल 2024 सीझन-17 साठी कॉमेंट्री करण्यासाठी साइन केले आहे. 2014 मध्ये नवजोत यांनी कॉमेंट्री सोडून राजकारणात प्रवेश केला होता. सध्या नवज्योत सिद्धू काँग्रेस पक्षाचा एक भाग आहे, तर आता सिद्धू आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे.

राजकारणात आल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॉमेंट्री करणे बंद केले होते. मात्र, भविष्यात सिद्धू पुन्हा कधीतरी कॉमेंट्री करताना दिसेल, अशी चाहत्यांना आशा होती. जे आता पूर्ण होणार आहे. सिद्धू आता IPL 2024 साठी कॉमेंट्री टीमच्या स्टार-स्टडेड लाइन-अपमध्ये सामील झाले आहे. ज्यामध्ये हर्षा भोगले, निक नाइट, मॅथ्यू हेडन, लक्ष्मण शिवरामकृष्णन, जॅक कॅलिस, केविन पीटरसन आणि इतरांचा समावेश आहे.

नवज्योत सिंग सिद्धूने टीम इंडियासाठी 51 कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सिद्धूने 51 कसोटी सामन्यांमध्ये 3202 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 9 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली. सिद्धूने 136 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4413 धावा केल्या होत्या. सिद्धूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply