IND vs ENG: धरमशालामध्ये रोहित शर्माची धुव्वाधार बॅटींग, जेम्स अँडरसनपासून शोएब बशीरपर्यंत सर्वांनाच धुतले

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर पाचवा आणि अंतिस कसोटी सामाना खेळल्या जात आहे. भारताच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने जोरदार फलंदाजी केली. आपल्या संघासाठी त्याने शानदार शतक केले. या सामन्यात त्याने इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही आणि सर्वांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. रोहित शर्माने154 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रोहित शर्माने केवळ वेगवान गोलंदाजांविरुद्धच नव्हे तर फिरकीपटूंविरुद्धही चांगली फलंदाजी केली. बऱ्याच दिवसांपासून रोहित शर्मा चांगली सुरुवात करत होता. पण त्याला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, या सामन्यात रोहित शर्माने जबरदस्त फलंदाजी केली. या मालिकेतील त्याचे हे दुसरे शतक आहे.

Pune News : पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणात मिस्ट्री गर्ल आली समोर; मास्टरमाईंडच्या प्रेयसीच्या अटकेनंतर मोठी अपडेट



हैदराबादमध्ये खेळली गेलेली पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली होती. मात्र, यानंतर भारतीय संघाने या मालिकेत चांगले पुनरागमन केले आणि सलग तीन कसोटी जिंकल्या. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 3-1 ने आघाडीवर आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. अंतिम कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात सर्व गडी गमावून 218 धावा केल्या. भारताकडून कुलदीप कुलदीप यादवने पहिल्या डावात ५ तर रविचंद्रन अश्विनने ४ बळी घेतले. जडेजाने एक विकेट घेतली.या सामन्यात भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी आघाडी घेतली आहे आणि इंग्लंडला पूर्ण दडपणाखाली ठेवले आहे. इंग्लंडला या सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर त्यांना येथून सलग विकेट्स घ्याव्या लागतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply