CSK vs RCB IPL 2024 : आठवडाभरापूर्वी स्ट्रेचरवर गेला होता मैदानाबाहेर... अन् IPL च्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला 'सामनावीर'

CSK vs RCB IPL 2024 Mustafizur Rahman Player Of The Match : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने शानदार विजयाची नोंद केली.

मुस्तफिजुर रहमानने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आणि त्याने एकूण 4 विकेट घेतल्या. काही दिवसांपूर्वी मुस्तफिझूर मैदानावर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर काढावे लागले. पण आता तो तंदुरुस्त आहे आणि पहिल्याच सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

18 मार्च रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चट्टोग्राममध्ये खेळला जात आहे. पहिल्या डावातील 48 व्या षटकात मुस्तफिझूर शेवटचे षटक टाकायला आला. जेव्हा त्याने पहिला चेंडू टाकला तेव्हा त्याला थोडे अस्वस्थ वाटले आणि तो मैदानावर पडला. त्यानंतर वैद्यकीय पथक मैदानावर आले.

IPL 2024 : 'माही भाई...' ऋतुराज गायकवाडने सांगितला CSK Vs RCB सामन्याचा टर्निंग पॉइंट

मुस्तफिजूरची प्रकृती खराब होती. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवर पडून मैदानातून बाहेर काढण्यात आले. तो आयपीएलमधून बाहेर पडेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही, पहिल्याच सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली.

मुस्तफिजुर रहमानने आरसीबीविरुद्ध शानदार गोलंदाजी करत एकूण 4 बळी घेतले होते. त्याचा पहिला बळी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस ठरला. जो केवळ 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रजत पाटीदारही मुस्तफिजूरचा बळी ठरला. मुस्तफिजूरने अनुभवी विराट कोहलीला आपली तिसरी शिकार बनवले. यानंतर कॅमेरून ग्रीनही बाहेरचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे मुस्तफिझूरने एकूण 4 विकेट घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply