IPL 2024 : ऋषभ पंत आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने घेतला महत्त्वाचा निर्णय! फ्रँचायझीने रात्री केली मोठी घोषणा

Rishabh Pant appointed Delhi Capitals captain for IPL 2024 :

आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार बदलला आहे. एकीकडे दिल्लीच्या करोडो चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे नव्या कर्णधाराचे नाव समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

आयपीएल सुरू होण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. याआधी दिल्ली कॅपिटल्सने 19 मार्चच्या रात्री नवीन कर्णधाराची निवड केली आहे. आयपीएल 2023 च्या आधी दिल्लीचा पूर्णवेळ कर्णधार ऋषभ पंतचा अपघात झाला होता. या कारणामुळे तो आयपीएल 2023 खेळू शकला नाहीत. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपद देण्यात आले. मात्र आता दिल्लीने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आपला नवा कर्णधार ऋषभ पंतची निवड केली आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर होता, मात्र पंतच्या पुनरागमनामुळे ही जबाबदारी वॉर्नरकडून परत घेण्यात आली असून ही जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे.

Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अमोल कोल्हेंविरोधात कुणाला मिळणार उमेदवारी?

पंतला कर्णधार बनवण्याची अटकळ आधीच बांधली जात होती, पण काल ​​बातमी आली की दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग कदाचित ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवणार नसून ते दुसऱ्याकडे सोपवणार आहेत.

पण आता फ्रँचायझीनेच जाहीर केले आहे की, ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्लीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला होता. तो कारमधून उत्तराखंडमधील त्यांच्या घरी जात होते. यावेळी त्याची कार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. यावेळी त्याचा जीव वाचला. त्यावेळी पंत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे खूप कठीण वाटत होते, पण अखेर 23 महिन्यांनंतर तो पुनरागमन करण्यात यशस्वी झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply