Dinesh Karthik set to retire from IPL : विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याचा आगामी आयपीएल हंगाम अखेरचा असेल. दिनेश कार्तिक आरसीबीकडून यंदा आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. 39 वर्षीय कार्तिक अखेरचा हंगाम खेळण्यासाठी सज्ज झालाय. ESPNcricinfo यानं दिनेश कार्तिक अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याचं वृत्त दिलेय. दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. पहिल्या हंगामापासून आतापर्यंत आयपीएल खेळणाऱ्या मोजक्याच खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचं नाव आहे. दिनेश कार्तिक, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, वृद्धीमान साहा आणि मनिष पांडे यांनी आतापर्यंत प्रत्येक आयपीएल हंगाम खेळला आहे.
2022 मध्ये कार्तिकची कामगिरी -
2022 पासून दिनेश कार्तिक आरसीबीच्या ताफ्यात आहे. आरसीबीने कार्तिकला 5.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. 2022 च्या हंगामात कार्तिकने धमाकेदार कामगिरी केली होती. कार्तिकने 16 सामन्यात 55 च्या सरासरीने आणि 183.33 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा चोपल्या होत्या. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात त्यानं सिंहाचा वाटा उचलला होता. या कामगिरीच्या बळावरच त्याचं टीम इंडियाक कमबॅक झालं होतं. 2023 मध्ये दिनेश कार्तिक याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.
|
टीम इंडियात कमबॅक:
आयपीएमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिक याचं टीम इंडियात कमबॅक झालं होतं. कार्तिकला 2022 च्या टी 20 संघात स्थान मिळाले होते. पण या स्पर्धेत तो अपयशी ठरला. त्याला या स्पर्धेतील तीन डावात फक्त 14 धावा करता आल्या. कार्तिकनं दीर्घ काळानंतर टीम इंडियात कमबॅक केले होते, पण अपयशी ठरल्यामुळे त्याला पुन्हा वगळलेय.
आयपीएलमध्ये सहा संघाकडून खेळला, आतापर्यंत कार्तिकची कामगिरी -
दिनेश कार्तिक सध्या आरसीबी संघाचा सदस्य आहे. 2015 मध्येही तो आरसीबीचा सदस्य होता. 2016 च्या हंगामासाठी त्याला आरसीबीने रिलिज केले होते. त्यांतर पुन्हा त्याला ताफ्यात घेतले. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकनं आतापर्यंत सहा संघाचे प्रतिनिधित्व केलेय. दिल्ली डेयरडेविल्स (2008-14), किंग्स इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्स 2011), मुंबई इंडियन्स (2012-13), गुजरात लायन्स (2016-17), कोलकाता नाइट राइडर्स (2018-21) आणि आरसीबी (2015, 2022-आतापर्यंत) या सहा संघाकडू दिनेश कार्तिक आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळला आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत 242 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये 26 च्या सरासरीने 4516 धावा त्याने केल्या आहेत.यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 132 इतका राहिलाय. विकेटच्या मागेही कार्तिकला चांगलं यश मिळालेय. त्याने 133 फलंदाजांना बाद केलेय.
आयपीएलमध्ये कर्णधार -
दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये कर्णधारपदही भूषावलं आहे. दिल्लीच्या संघामध्ये असताना सहा वेळा बदली कर्णधार म्हणून तो मैदानात उतरला होता. तर कोलकाता संघासाठी 37 सामन्यात त्यानं नेतृत्व केलेय. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघाने 21 विजय मिळवले अन् 21 पराभव पाहिले.
समालोचक म्हणून काम -
भारतीय क्रिकेटमध्ये संधी मिळणं कठीण झालं, तेव्हा दिनेश कार्तिकनं दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. दिनेश कार्तिक यानं समालोचक म्हणून काम केलेय. कार्तिक आता चांगला ब्रॉडकास्टर म्हणून प्रसिद्ध झालाय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातही तो समालोचन करतोय.
शहर
- Pimpri Chinchwad Crime : पिंपरीतील १८ वर्षीय तरुणीचा शेजाऱ्यानेच काटा काढला, परराज्यातील मामा-भाच्याला अटक; हत्येचं कारण समजलं?
- Mumbai Marathi School : मुंबईत १० वर्षात १०० मराठी शाळा बंद; मराठी भाषा जगणार कशी?
- Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडून ६ जणांचा मृत्यू, १४ जनावरे दगावली
- Whatsapp : वर स्टेट्स, बाथरूममध्ये जाऊन गळा चिरला; बीडच्या तरूणानं पुण्यात आयुष्य संपवलं
महाराष्ट्र
- Kolhapur : अंबाबाई अन् जोतिबा मंदिरात शॉर्ट ड्रेसला मनाई, पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय
- Maharashtra Monsoon : वार्ता आनंदाची! मान्सून आगमनाची तारीख ठरली, पुणे IMD ने वर्तवला अंदाज
- Washim Crime : मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक, वाशिममध्ये तणाव, सहा जणांना घेतले ताब्यात
- 10th SSC Result : परंपरा राखली! यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा