Pune Porsche Accident Case : नाव काळेंचं, काम मुश्रीफांचं?; तावरेला वाचवणारे मोकाट, काळे सक्तीच्या रजेवर

Pune Porsche Accident Case :  पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी रोज नवनवे खुलासे होतायत. आमदार आणि मंत्र्यांच्या शिफारशीनं तावरेची नियुक्ती केल्याचा दावा ससूनच्या डीन यांनी केल्यानंतर त्यांच्यावरच खापर फोडण्यात आलंय. तावरेवर कुणाचा आशीर्वाद होता आणि कुणाच्या चुकीमुळे ससूनमध्ये अनागोंदी सुरू होती यावरचा हा विशेष रिपोर्ट...

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता या प्रकरणातील राजकीय धागेदोरे किती खोलवर गुंतलेत हे उघड झालंय.. अगरवाल कुटुंबियांपाठोपाठ पोलिस, ससूनमधील डॉक्टरांचे 'रॅकेट' उघड झालं आणि आतापर्यंत डझनभर दोषींवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, या घटनेत आमदार, मंत्र्यांचेही हात असल्याचे तपासातून आता पुढं येऊ लागलंय.. ससूनमधील डॉ.अजय तावरेंच्या नेमणुकीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे चांगलेच गोत्यात आले.

Kalyan Crime : जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, भांडण सोडवण्यास गेलेली तरुणाची आईही जखमी; घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

सुनील टिंगरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ. अजय तावरे याची अधीक्षकपदी नियुक्ती केल्याचा गौप्यस्फोट बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी केला आणि या दोघांचं बिंग फुटलं. मात्र मुश्रीफांनी काळेंवरच सगळ्या गैरकृत्याचं खापर फोडून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं.

 तावरेवरील आरोपांची माहिती मुश्रीफांना नव्हती का ? ससूनमधल्या एका प्रकरणात तावरेची चौकशी सुरू असताना पुन्हा त्याच रुग्णालयात अधीक्षकपदी नियुक्ती कशी केली? आमदाराच्या शिफारस पत्रावरून अधीक्षक नेमला जातो का? गेल्या दीड वर्षात पाच अधीक्षक बदलण्याची वेळ का आली?

ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणात वादात सापडलं. मात्र त्यातून धडा घ्याचं सोडून आमदारांपासून मंत्र्यांपर्यत सर्वांनीच आपल्याला हवा तसा ससूनचा वापर केला आणि ड्रंक अँड ड्राईव्ह सारख्या गंभीर प्रकरणातला गैरकारभार चव्हाट्यावर आला. काळेंनी काळ्या कारनाम्याचं बिंग फोडल्यानंतर त्याची चौकशी करायचं सोडून त्यांचाच राजकीय बळी देण्याचा प्रकार सुरू आहे. वारंवार कायद्याची लक्तरं वेशीला टांगणा-या तावरेसारख्यांवर हात असणा-या आमदार आणि मंत्र्यांची चौकशी होणार का हा खरा प्रश्न आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply