South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई मतदारसंघात महायुतीचा नवा डाव; मिलिंद देवरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, मनसे फॅक्टर महत्त्वाचा

South Mumbai Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवरमहायुतीमध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईतील दक्षिण मुंबईच्या जागेवरुनही शिवसंना आणि भाजपमध्ये तिढा कायम आहे. दक्षिण मुंबईतून निवडणुक कोण लढवणार यासाठी अनेक नावे समोर येत आहे.

मात्र आता मुंबई दक्षिणमधून महायुती मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मिलिंद देवरा शिंदे गटातून राज्यसभेवर खासदार आहेत. मुंबई उत्तर मध्यच्या बदल्यात मुंबई दक्षिण मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. 

Pune News : प्रवाशांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ८० ज्यादा बसेस धावणार

मागील अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकर यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं.

मिलिंद देवरा यांची राज्यसभेची जागा मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकरांना देण्याची मनसेला ऑफर आहे. मुंबई दक्षिणमधून भाजपचे राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply