Songir Accident : महामार्ग दुरुस्ती करणाऱ्या मजुरांना भरधाव डंपरने उडविले; एकाच मृत्यू, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

Songir Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या सोनगीर टोल नाक्याजवळ दुरुस्तीचे काम करत असणाऱ्या  मजुरांना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने धडक दिली. या अपघातात  एका मजूराचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर जखमी झाले आहेत. 

मुंबई- आग्रा महामार्गावर  सोनगीर टोल नाक्याजवळ ८ एप्रिलला पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. यात  सोनगीरकडून धुळ्याकडे वाळू भरून जाणाऱ्या डंपरने डांबर यंत्राला जोरदार धडक दिली. यामध्ये यंत्रावर काम करणाऱ्या सुभाष साहेबराव बाबर (वय ४५), गोपाळ बाळासाहेब मुळे व अन्य एक मजूर (सर्व रा. पारनेर, ता. अंबड, जि. जालना) अशा तिघांना उडविले. त्यात सुभाष बाबर यांचा डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोन मजूर धडकेने बाजूला फेकले गेले. जखमी गोपाळ मुळेवर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashta Election 2024 : सांगलीच्या जागेचा तिढा मिटला; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल

अपघातानंतर डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित अन्य मजुरांनी खासगी वाहनाने पाठलाग करत नगावजवळ त्याला पकडले. यानंतर पोलिसांनी डंपरसह चालक हेमंत पुंजू पाटील यास ताब्यात घेतले आहे. मृत बाबर यांचा पुतण्या करण विष्णू बाबर याने सोनगीर पोलिसात तक्रार दिली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply