Solapur : अजित पवारांची शपथ; सोलापूरात राष्‍ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

सोलापूर : महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात पुन्‍हा भुकंप झाला असून अजित पवार यांच्‍यासमवेत राष्‍ट्रवादीचे आमदार फुटले आहे. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्‍यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर फटाके फोडत जल्लोष केला. 

महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात गेल्‍यावर्षी मोठा भुकंप झालेला पहावयास मिळाला होता. यात शिवसेनेचे चाळीस आमदार फुटले होते. यानंतर पुन्‍हा भुकंप झालेला पहावयास मिळाला असून यावेळी राष्‍ट्रवादीचे आमदार भाजप व शिवसेना यांच्‍यासोबत जावून पाठींबा दर्शविला आहे. यात आज राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्‍यमंत्री पदाची तर राष्‍ट्रवादीच्‍या आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Nandurbar : बालविवाह रोखण्यासाठी अनोखी अक्षता मोहिम; जिल्हाभरात ३ महिन्यात रोखले २८ बालविवाह

राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. यानंतर सोलापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तसेच कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मिठाई वाटली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *