Solapur : शहरात नावाजलेला व्यवसाय, मोठी प्रतिष्ठा; तरीही उद्योजकाने १७व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं, नेमकं कारण काय?

Solapur : सोलापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांनी गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजापूर रोडवरील सर्वात उंच पनाश अपार्टमेंटवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ते सतराव्या मजल्यावर चढून हात जोडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ते सतराव्या मजल्यावर थांबून हात जोडून प्रार्थना करत होते, खाली झोपून स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करत होते. सोसायटीमधील एका व्यक्तीने त्यांना समजावून खाली आणले मात्र त्यांच्या हाताला झटका देत पुन्हा ते वर गेले आणि उडी मारल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल
गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पनाशच्या १७व्या मजल्यावर एक व्यक्ती हात जोडून उभा राहिल्याचे काही लोकांना दिसून आले. इमारतीवरील व्यक्ती ही सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक सदारंगानी आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती. सुरुवातीला सदारंगानी हे इमारतीच्या अगदी कोपऱ्यावर येऊन फिरत होते. रस्त्यावरून पाहणाऱ्या व्यक्तींकडून ही माहिती एकाकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचली. इमारतीच्या सतराव्या मजल्यावर फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गाडीच्या नंबर प्लेट वरून कळलं
मुलतानी बेकरीच्या मालकाने गुरुवारी दुपारी ४च्या सुमारास विजापूर इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. सुनील मोतीलाल सदारंगानी (वय ५९, रा. मूळ सोलापूर, सध्या पुणे) असे त्यांचे नाव आहे. त्यानंतर सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाला.शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.सदारंगानी काही वर्षांपूर्वी पुणे येथे राहण्यास गेले होते.


ते मागील काही दिवसांपासून तणावात होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची वार्ता विजापूर नाका पोलिसांना कळताच तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, पोलिस निरीक्षक सुशांत वराळे विलास घुगे हे घटनास्थळी गेले. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. त्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटवरून पोलिसांना त्यांची ओळख पटली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Solapur : शहरात नावाजलेला व्यवसाय, मोठी प्रतिष्ठा; तरीही उद्योजकाने १७व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं, नेमकं कारण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *