Ujjani Dam : दमदार पावसानंतर किती भरले उजनी धरण? वाचा काय आहे लेटेस्ट अपडेट

Solapur News : जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आता उणे ३७ टक्क्यांवर आले आहे. धरणात सध्या आठ हजार क्युसेकने पाणी जमा होत आहे. भीमानगर येथे सोमवारी (ता. ८) दिवसभर ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक रात्री नऊ वाजेपर्यंत आठ हजार क्युसेकपर्यंत होती.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण पावसाळा सुरू होऊन २२ दिवस झाले, तरीदेखील प्लसमध्ये आलेले नाही. अजूनही सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी धरणावर दुबार पंपिंग सुरूच आहे. यंदाच्या उन्हाळ्यात धरण पहिल्यांदाच उणे ६० टक्क्यांवर पोचले होते .
७ जून रोजी धरण उणे ५९.१९ टक्क्यांवर (३१.५२ टीएमसी) होते. मागील महिनाभरात धरणात साडेबारा टीएमसी पाणी जमा झाले आहे. अजूनही धरण परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील पावसाचे पाणी वरणात आल्याने आणि आता भीमानगर परिसरात चांगला पाऊस झाल्याने आता धरण उणे ३७ टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणात आता विसर्ग वाढल्याने दोन दिवसात एक टीएमसी पाणी वाढणार आहे.

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा दहशतवादी हल्ला; आतापर्यंत ५ जवान शहीद

समांतरच्या अडथळ्यावर तीन कोटी खर्च

सोलापूर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सोलापूर ते उजनी अशी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. सध्या ९३ किमी काम पूर्ण झाले आहे. पण, धरणातून रोडपर्यंत येताना ८०० मीटर अंतरांसाठी खासगी जमीन लागणार आहे. त्याठिकाणच्या बाधित शेतकऱ्याऱ्यांना एक कोटींचा मोबदला दिला जात आहे

तर आता टेंभुर्णीजवळ देखील असाच अडथळा असून १८०० मीटरपर्यतच्या खासगी जमिनीसाठी बाधित शेतकऱ्यांना दोन कोटीपर्यंत भरपाई द्यावी लागणार आहे त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे धरणातील पाणीसाठा वाढण्यापूर्वी तेथील जॅकवेलचे काम गतीने सुरू केले आहे. जेणेकरून मुदतीत पाइपलाइनचे काम पूर्ण होईल
महापालिकेचे दुबार पंपिंग बंद होणार

उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सोलापूर महापालिकेला शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तिबार पपिंग करावे लागले होते. पण, धरणातील पाणीसाठा वाढल्याने महापालिकेने तिबार पंपिंग बंद केले. आता धरण उणे ३५ टक्क्यांवर आल्यास दुबार पंपिंग देखील बंद केले जाणार आहे. सध्या औज बंधारा हाऊसफुल भरलेला असून हिप्परगा तलावात देखील चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा 'जैसे थे' राहणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply