Solapur : पंढरपूर- कराड रोडवर सात महिलांना ट्रकने चिरडले ! रस्त्यावर एसटी बसची वाट पाहात थांबलेल्या 7 पैकी 5 महिलांचा जागीच मृत्यू

Solapur : चिकमहूद येथील शेतातील मजुरीचे काम आटोपून घरी निघालेल्या महिलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले आहे. त्यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत.

CM Shinde : टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दिला जाणार विमा अन् मुलांना नोकरी

या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतातील काम संपल्यानंतर दुपारून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या पंढरपूर- कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. ट्रक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सात महिलांच्या अंगावर वाहन नेले, नेहमीप्रमाणे त्या महिला काम आटोपल्यानंतर एसटी बसते गावी जाण्यासाठी पंढरपूर- कराड महामार्गावर थाबल्या होत्या, पण, अचानक भरधाव वेगाने तो ट्रक त्यांच्या दिशेने आला. बाजूला महामार्गाचे लोखंडी बंरिगेट असल्याने त्यांना बाजूला सरकताच आले नसल्याची चर्चा त्याठिकाणी होती



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply