Solapur News : सोलापुरातील अनोखी धुलवड! दोन गटांमध्ये झाली तुफान दगडफेक; ४०० वर्षांची प्राचीन परंपरा

Solapur News : देशासह राज्यभरात धुलिवंदन जल्लोषात साजरी केली गेली. महाराष्ट्रात विविध भागात धुलवडीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्राचीन परंपरेनुसार साजरा केला जातो. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावातही अशीच एक अनोखी परंपरा आहे. गावामध्ये चक्क एकमेकांवर दगडाचा वर्षाव करुन धुलवड साजरी केली जाते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या भोयरे गावात दगडांची अनोखी होळी खेळली जाते. भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो.

MD Drugs : सांगलीत एमडी ड्रग्जचं मोठं घबाड पोलिसांच्या हाती? 'या' गावात सुरु होता कारखाना...

मागील चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. या दगडफेकीत गावकऱ्यांना दगड लागला तरी काहिही होत नसल्याची भावना आहे. यामध्ये जरी एखादा जखमी झाला तर जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो. तसेच या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते. त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply