Solapur News : मुख्यमंत्र्यांनी संविधानाचा अपमान केला : यशवंत संघर्ष सेना; सोलापुरात धनगर, ओबीसी समाजाचा मोर्चा

Solapur News : सोलापुरात यशवंत संघर्ष सेनेकडून धनगर, ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात आला आहे. सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धनगर ओबीसी बांधवांकडून विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. 

धनगर बांधवांनी पारंपारिक वेश परिधान करून धनगरी ढोल वाजवत या मोर्चात सहभाग नोंदवला. धनगर आरक्षणाची  अंमलबजावणी, ओबीसी आरक्षणात मराठा बांधवांना समाविष्ट केल्याच्या विरोधात धनगर आणि ओबीसी बांधवांनी मोर्चा काढला.

Manoj Jarange : मराठा आरक्षणानंतर धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढणार

यावेळी राज्य सरकार विरोधात धनगर - ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. येत्या 16 फेब्रुवारी पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांकडून सामाजिक न्याय विभागाकडे लाखोंच्या स्वरूपात हरकती दाखल करुन ओबीसीकरणाला आंदाेलक तीव्र विरोध करणार आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे एका समाजाचे नसून त्यांनी संविधानाचा अपमान करून मराठा समाजाचे असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यशवंत संघर्ष सेनाकडून करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply